दुःख अडवायला उंबऱ्यासारखा। Dukh advayla umbaryasarkha

मैत्री वरील कविता

दुःख अडवायला उंबऱ्यासारखा ,

मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा……… १


वाट चुकणार नाही जीवनभर कोणी,

एक तू मित्र कर आरशासारखा,

मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा……. २


आत्महत्याच करणार नाही कोणी,

मित्र असला जवळ जर मनासारखा,

मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा…….. ३


त्रासलो जिंदगी चाळताना पुन्हा,

बस धडा मैत्री वाचण्यासारखा,

मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा……. ४


मैत्री चाटते गाय होऊन मना,

जा बिलग तू तिला वासरासारखा,

मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा…… ५


कवी अनंत राऊत

No comments:

Post a Comment

Best hospitals in chandwad

If you are a student living in a hostel or if you are new in chandwad , here is the list of best hospitals in Chandwad,Tal.Chandwad Dis.Nash...